111+ Akbar Birbal Story In Marathi :- नमस्कार मित्रांनो, मी आज या ब्लॉग मध्ये विविध प्रकारची छान-छान akbar birbal story in marathi (अकबर बीरबल) यांच्या मराठीत गोष्टी (कथा) प्रदशित केल्या अाहते. व आपल्याला विविध प्राकारच्या गोष्टी (कथा) वाचन्याची अावड असेल तर, या ब्लॉग मधिल गोष्टी आपणास खुप अवडातील, धन्यावाद.
अकबर बादशहा आणि पोपट
![]() |
| akbar and birbal story in marathi |
"एकदा, एक गरीब माणूस राजदरबाराला भेट देतो. त्याने त्याच्याबरोबर एक सुंदर पोपट आणलेला असतो. व तो महाराजांपुढे पोपट सादर करतो. महाराजांना तो पोपट खूप आवडला. अकबर तो पोपट आपल्याकडे ठेवून घेतो व त्या माणसाला योग्य ते बक्षिस देऊन दरबारातून जायला सांगतो.
अकबर तो पोपट एका नोकराकडे देतो व म्हणतो.‘या पोपटाची व्यवस्थित काळजी घे व त्याला वेळोवेळी खाऊ घाल व त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. तो आजारी आहे किंवा मेला आहे अशा प्रकारची कोणतीही बातमी घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. जर तू अशी वाईट बातमी माझ्याकडे घेऊन आलास तर मी तुझे डोके धडापासून कापून वेगळे करेल.’
तो नोकर पोपटाची खरोखरच नीट काळजी घेत असे.
तरीसुध्दा,एके दिवशी तो पोपट आजारी न पडता मेला. हे बघून तो नोकर खूप घाबरला त्याने मनातल्या मनात विचार केली की, ‘जर मी हे सांगायला महाराजांकडे गेलो तर, त्याचवेळी माझा मृत्यू निच्छीत आहे जर मी आत्ता याबद्दल कळविले नाही तरीसुध्दा काही दिवसांनी महाराजांना हे समजेल व माझी शिक्षा ही मृत्यूच असेल. मी आता काय करू?’
त्याला काहीही कळत नव्हते की आता काय करावे. तो नोकर बिरबलकडे गेला व त्याला सर्व काही सांगितले.
बिरबल त्याला म्हणाला काही काळजी करू नको मी स्वतः अकबरशी बोलतो.
‘महाराज तुमचा पोपट.....’ बिरबलने त्याचे वाक्य पूर्ण करण्याच्या आतच.
‘माझा पोपट!’ अकबर बोलला ‘काय झाले त्याच्याबरोबर?’
‘विशेष असे काही नाही महाराज! परंतु तो....’
‘मला एकदा सांग, बिरबल’ अकबर उतावीळपणे बोलला, ‘तो मेला आहे का?’
‘नाही..नाही.. महाराज. तुमचा पोपट तर मोठया संन्यासीमध्ये परिवर्तित झाला, त्याचे आकाशाकडे तोंड आहे व तो डोळे बंद करून पाठीवर झोपला आहे.’
‘मग तू का सांगत नाही, की पोपट मेला आहे म्हणून?’ अकबर बिरबलवर ओरडत म्हणाला.
‘जर तुम्हाला असे बोलणे आवडत असेल तर. तुम्ही बोलू शकता महाराज पण मी कसे बोलू शकतो?’ बिरबल बोलला. ‘कारण मला असे वाटते की तो प्रार्थना करीत आहे.’
‘चल जाऊया आणि त्याला बघूया.’ अकबर बोलला.
बिरबलने पोपटाचा पिंजरा दाखवला. अकबरने बघितले की पोपट मेला आहे.
‘बिरबल तू तर खूप बुध्दीमान आहेस’ अकबर बोलला.
‘परंतु मला तुला बघून आश्चर्य वाटते की तू जिंवत आणि मृत पोपट यांमध्ये फरक ओळखायला सक्षम नाही. पो
पट मेला आहे असे तु मला आधी का सांगितले नाही.’
‘मी असे कसे बोलू शकतो महाराज?’ बिरबल बोलला. ‘तुमचा पोपट मेला आहे असे मी जर तुम्हाला बोललो असतो तर तुम्ही माझे डोके धडापासून वेगळे केले असते.’
आता अकबरला त्याचे शब्द आठवले. पोपटाला सांभाळण्याची जबाबदारी नोकरावर सोपवल्यानंतर तो बोलला होता की ‘जर तू माझ्याकडे पोपट मेला आहे अशी बातमी घेऊन आला तर मी तुझे डोके धडापासून वेगळे करेल.’
अकबरने स्मित हास्य केले.
‘अरे बिरबल, तू तर खरोखरच बुध्दीमान आहेस!’ अकबर बोलला.
========++++++++++========
कोंबडीचे अंडे
"बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून अकबरला हे माहिती होते की.बिरबलची मजाक करणे सोपी गोष्ट नाही. तरीसुध्दा अकबर स्वतःला थांबवू शकत नसे व कधीकधी बिरबलची मजाक करत असे.
एके दिवशी बिरबल दरबारात येण्यापूर्वी अकबरने दरबारातील सर्व दरबाऱ्यांना एक एक कोंबडीचे अंडे दिले व त्यांना बिरबला बरोबर करण्याच्या गंमती बद्दल योजन सांगितली.
नेहमीप्रमाणे जेव्हा बिरबल दरबारात आला तेव्हा अकबर त्याला म्हणाला, ‘काल रात्री मला एक स्वप्न पडले त्यात एका ऋषींनी मला सांगितले की, जे दरबारी बागेतील तलावात जातील व तलावातून आपल्या बरोबर हातात अंडे घेऊन येईल तेच माझ्यासाठी निष्ठावंत असतील. तरी आता सर्वांनी तलावात जाऊन त्यातून एक एक अंडे आणावे.’
त्यानुसार, सर्व दरबाऱ्यमधून एक एक दरबारी तलावातील पाण्यात डुबकी मारून आपल्या बरोबर एक अंडे घेऊन बाहेर येत होते. शेवटी आता बिरबलचा नंबर होता.
बिरबलने तलावात उडी मारली परंतु अंडे सापडण्यात तो अयशस्वी झाला. त्याला त्वरीत लक्षात आले की ही अकबरची माझ्यासोबत गंमत करण्याची योजना आहे.
बिरबल तलावाच्या बाहेर येताच कोंबडयाच्या आवाजात ओरडु लागला. कोंबडयाच्या त्या आवाजामुळे अकबर संतप्त झाला. तो बोलला, ‘तू वेडा झाला आहेस का? तलावातून प्रत्येक जण आपल्या सोबत अंडे घेऊन आला परंतु तुझ्या हातात अंड नाही. असे का?’
बिरबल बोलला ‘महाराज! फक्त कोंबडयाच अंडे घालू शकतात. मी तर कोंबडा आहे.’
अकबरने दरबाऱ्यांकडे बघितले व चोरून हसला. व दरबाऱ्यांनी गोंधळून आपले हात एकमेकांवर मारले."
========++++++++++========
बादशहा झक मारत आहे
![]() |
| akbar birbal story in marathi writing |
"एके दिवशी अकबर आणि बिरबल फिरत होते व फिरता फिरता नदी काठी पोचले. नदी काठी काही मच्छीमार हे मासे मारत होते. त्यांना मासे मारतांना बघून अकबरला पण मासे मारण्याचा मोह झाला. व त्यानेही मासे मारण्यास सुरूवात केली. काही कारणा निमित्त बिरबलला राणीकडे निरोप घेऊन जावे लागले. तेथे पोहचल्यावर राणीने राजी खुशी व्यतीरिक्त विचारले की, बादशहा कुठे आहेत?
राणी या उत्तराने खूप नाराज झाली व जेव्हा बादशहा अकबर महालात आले तेव्हा बिरबलने केलेल्या कृत्याची गोष्ट कथन केली आणि बिरबलला शिक्षा देण्याची विनंती केली. आपल्या प्रती बिरबलचे असे अपशब्द ऐकून बादशहा क्रोधीत व रागाने लाल झाला. यावर राणीने महाराजांना टोमणा मारला, बिरबलला खूप डोक्यावर चढवले आहे याचे फळ हेच असणार आहे.
राणीच्या या बोलण्याने बादशहा आणखी चिडला. बादशहाने त्याचवेळी शिपायांना आज्ञा दिली की बिरबलला ताबोडतोब बोलवून आणा. आज्ञा मिळताच शिपाई बिरबलला घेऊन आले. बिरबल येताच अकबर बादशाह क्रोधीत होऊन बोलला, ‘आज तू राणीला काय सांगितले? तुझे डोके जास्तच चालते आहे.’
बिरबलने नम्रपणे सांगितले मी तर फक्त हे सांगितले होते की, ‘बादशहा झक मारत आहे. याचे कारण असे आहे की आपल्या संस्कृत भाषेत माश्याला झक म्हणतात. यामुळे मी असे बोललो. जर माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करावी.’
बिरबलचे उत्तर ऐकून अकबर बादशहाचा राग शांत झाला व राणीही आनंदी झाली."
========++++++++++========
"एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठया पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.'
शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले.
तात्पर्य - करावे तसे भरावे."
========++++++++++========
बिरबल सापडला
![]() |
| akbar birbal marathi goshti |
"एकदा, एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा चालू होती व क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली व राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला.
परंतु, काही दिवसांतच अकबरला दरबारात बिरबलची अनुपस्थिती जाणवू लागली. वेळोवेळी अकबर बिरबलची आठवण काढत असे व चिंता करत असे. परंतु, बिरबलचा ठावठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलला परत आणण्यासाठी एक युक्ती बनवली.
त्याने पूर्ण राज्यात दवंडी पिटविली की, ‘जो माणूस सावलीतही उभा नसणार व उन्हातही नसणार म्हणजेच जो व्यक्ती अर्धे ऊन व अर्ध्या सावलीत चालेल व जो अत्यंत उपाशी असेल अशा व्यक्तीला खूप मोठया रकमेचे बक्षिस दिले जाईल.’
हया दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबलपर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्या जवळ बोलवून राजदरबारात जाण्यास सांगितले. तसेच राजाच्या प्रश्नांना कशी उत्तरे दयावी तेही सांगितले.
बिरबलने एक मोठी खाट त्या माणसाला दिली व बोलला, ‘ही खाट तू तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाडयात जा. जाताना चुरमुरे खात खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे राजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दे.’
बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने खाट आपल्या डोक्यावर ठेवली व राजवाडयाकडे जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे व चुरमुरे खात चालला होता. अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. जेव्हा तो म्हणाला महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षिस घेण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर त्याला दरबारात सोडण्यात आले.
तो राजदरबारात त्याच पध्दतीने गेला. त्या मजेदार माणसाला बघून अकबर बोलला, ‘कोण आहेस तू?’
‘मी एक माणूस आहे.’ तो बोलला.
‘अच्छा! मग तू असा डोक्यावर खाट ठेऊन का आला आहेस?’ अकबरने विचारले.
तो बोलला, ‘महाराज! ही तुमचीच घोषणा आहे, की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षिस देणार आहात जो सावलीतही नाही व उन्हातही नाही. त्यामुळे मी ही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही व थेट सुर्यप्रकाशातही नाही.’
त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले. अकबर बोलला ‘हे काय आहे? तू राजदरबारात का खात आहे?’
तो म्हणाला, ‘महाराज! ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे. मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही कारण मी खूप भूकेलेला आहे.’
हे सर्व ऐकून अकबर कुतुहलाने बोलला, ‘सांग मला, तुला हे सर्व कोणी शिकविले?’
‘महाराज! काही महिन्यांपासून आमच्या गावात एक अनोळखी विव्दान व्यक्ती रहात आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी हे कार्य केले आहे.’ तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला.
अकबरला लगेच समजले की तो अनोळखी व्यक्ती कोण आहे ते. तो आनंदाने ओरडला, ‘मला बिरबल सापडला!’ त्यानंतर त्याने त्या माणसाला योग्य ते बक्षिस दिले. त्याने आपले काही दूत त्या गावात पाठविले व राजसन्मानाने बिरबलला परत आणले."
========++++++++++========
बिरबल काळा कसा झाला
![]() |
| akbar birbal short stories in marathi |
"बिरबलचा रंग सावळा होता. एक दिवस दरबारात माणसाची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा चालू होती.
बरेच लोक माणसाच्या कुरूपतेचे स्मरण करूनच हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले. त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलला वाटत होते की दरबारातील दरबाऱ्यांचे आकस्मात हसण्याचे कारण त्यांना विचारावे परंतु काही विचार करून तो गप्प राहीला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व थोडयाचे वेळात बिरबलला संधी मिळाली तेव्हा त्याने अकबरला विचारले, ‘महाराज! आपण सर्वजण हसतमुख का दिसत आहात?’
अकबर बोलला, ‘लोकांच्या हसण्याचे कारण तुझी कुरूपता आहे, त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत परंतु बिरबल काळा कसा झाला.’
बिरबल बोलला, ‘मला खेद वाटतो की, आत्तापर्यंत याचे कारण कोणालाही समजले नाही.’ बादशहा बोलला सांगितल्याशिवाय लोकांना कसे समजणार. जर तुला कुरूपतेचे कारण माहीती असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्यांच्या मनातील भ्रम दूर कर.
बिरबलने उत्तर दिले, ‘महाराज ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीचा निर्माणाला सुरूवात केली तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवांच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली. तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना सर्व प्रथम रूप, दुसर धन, तिसरे बुध्दी, आणि चौथे बल प्रदान केले.
चारी गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती. मी बुध्दी घेण्यात राहून गेलो जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेली होती त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो. मी फक्त बुध्दीच घेऊन राहून गेलो आणि तुम्ही मात्र धन आणि रूप यांच्या लालचमध्ये होते. याच कारणामुळे मी कुरूप राहून गेलो.
बिरबलचे हे उत्तर ऐकून बादशहा अकबर व दरबाऱ्यांची मने तुटली आणि नंतर त्या लोकांनी बिरबलची मजाक कधीच केली नाही."
========++++++++++========
"अकबरच्या दरबाऱ्यांची नेहमीच एक तक्रार असे की बादशाह नेहमी बिरबललाच बुध्दीमान मानतात बाकीच्यांना नाही.
एक दिवस अकबरने सर्व दरबाऱ्यांना दरबारात बोलविले आणि दोन हात लांब व दोन हात रूंद चादर त्यांच्याकडे देत म्हणाले, ‘या चादरीने तुम्ही लोकं मला डोक्यापासून तर पायापर्यंत झाकून दाखवा तर मी तुम्हाला बुध्दीमान मानेल.’
सर्व दरबाऱ्यांनी प्रयत्न केला परंतु ते त्या चादरीने अकबरला पूर्णपणे झाकू शकले नाही. डोके झाकले तर पाय बाहेर रहायचे, आणि पाय झाकले तर डोके चादरीच्या बाहेर रहायचे.
आडवे, उभे, तिरपे सर्व प्रकारांनी प्रयत्न करून देखील कोणालाही त्यात यश आले नाही.
आता अकबरने बिरबलला बोलविले व तीच चादर त्याला देत स्वतःला त्यात झाकून दाखविण्यास सांगितले.
जेव्हा अकबर खाली झोपला तेव्हा बिरबलने अकबरचे पसरलेले पाय मुडपण्यास सांगितले. अकबरने बिरबलने सांगितल्याप्रमाणे पाय मुडपले आणि बिरबलने अकबरला आता डोक्यापासून पायापर्यंत चादरीने झाकले.
सर्व दरबारी आश्चर्याने बिरबलकडे बघत होते. तेव्हा बिरबल बोलला, ‘जेवढी लांब आपली चादर असेल तेवढेच आपण पाय पसरावेत.’"
========++++++++++========
"दरबाराचे कामकाज चालू होते. सर्वजण एका अशा प्रश्नावर चर्चा करत होते की राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टिने महत्वाचे होते. सर्व एक एक करून आपले मत व्यक्त करत होते. अकबर दरबारात बसून हे सर्व ऐकत होता व त्याला असे जाणवले की सर्वांचे म्हणणे वेगवेगळे आहे. त्यांना आश्चर्य वाटले की सर्व एकसारखेच विचार का करत नाही!
अकबरने बिरबलला विचारले, ‘तू मला सांगू शकतो का, की लोकांमधील प्रत्येकाचे मत आपापसात का मिळत नाही? सगळे वेगवेगळया पध्दतीने विचार का करतात?’
‘प्रत्येक वेळेस असे होत नाही, महाराज!’ बिरबल बोलला, ‘काही समस्या अशा असतात की ज्यावर सर्व एकसारखे विचार करतात.’ यानंतर कामे आटोपून दरबारातील कार्यवाही समाप्त झाली व सगळे आपापल्या घरी निघून गेले.
त्या संध्याकाळी अकबर आणि बिरबल बागेत फिरत होते, तेव्हा अकबरने पुन्हा सकाळचा प्रश्न बिरबलला केला व त्याबद्दल निरसन करायला सांगितले. त्यानंतर बिरबलने बागेत एका कोपऱ्यात बोट करून सांगितले की , ‘त्या तिथे झाडाजवळ एक विहीर आहे तिथे चला, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा लोकांशी निगडीत काही समस्या असतात तेव्हा सर्वजण एकसारखाच विचार करतात. माझे म्हणणे असे आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यावर लोकांचे विचार एकसारखेच असतात.’
अकबरने विहीरीजवळ काहीवेळ बघितले व बोलला, ‘परंतु मला काहीही समजले नाही, तुझी समजवण्याची पध्दत जरा वेगळीच आहे.’ अकबरलाही माहीत होते की बिरबल आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी असेच काहीतरी प्रयोग करत असतो.
‘सर्व काही समजेल महाराज!’ बिरबल बोलला.‘आपण राजकीय आदेश जाहीर करा की राज्यातील प्रत्येक घरातून एक तांब्या दूध बागेत असलेल्या विहीरीत आणून टाकले जावे. पौर्णिमेचा दिवस असेल. आपले राज्य खूप मोठे आहे, जर प्रत्येक घरातून एक तांब्या दूध या विहीरीत पडले तर ही विहीर दूधाने भरून जाईल.’
बिरबलचे हे बोलणे ऐकून बादशहा अकबर जोरजोरात हसू लागला. तरीपण त्याने बिरबलने सांगितल्याप्रमाणे राजआदेश काढला. पूर्ण राज्यात दवंडी पिटवली गेली की, ‘येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक तांब्या दूध शाही बागेतील विहीरीत आणून टाकावे. जो असे करणार नाही त्याला शिक्षा दिली जाईल.’
पौर्णिमेच्या दिवशी बागेच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. या गोष्टीवर विशेष लक्ष ठेवले गेले की प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती आलेली आहे. सर्वांच्या हातात भरलेले भांडे दिसत होते.
अकबर आणि बिरबल लांब बसून हे सर्व काही बघत होते आणि एकमेकांकडे बघून हसत होते. संध्याकाळ होण्याच्या आधी विहीरीमध्ये दूध टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. प्रत्येक
घरातून दूध आणून विहीरीत टाकले गेले होते.
जेव्हा सर्व लोक तिथून निघून गेले तेव्हा अकबर व बिरबल दोघेही विहीरीजवळ गेले व विहीरीमध्ये त्यांनी डोकवून बघितले. विहीर काठोकाठ भरलेली होती. परंतु विहीर दूधाच्या ऐवजी पाण्याने भरलेली होती हे बघून अकबर चकित झाला.
हैराण झालेल्या नजरेने अकबरने बिरबलकडे बघत विचारले, ‘असे का झाले? शाही आदेश तर विहीरीत दूध टाकण्याचा निघाला होता, परंतु हे पाणी कुठुन आले? लोकांनी दूध का नाही टाकले?’ बिरबल जोरात हसून बोलला, ‘हेच मला सिध्द करायचे होते महाराज! मी तुम्हाला सांगितले होते ना की बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यावर लोक एकसारखा विचार करतात. हे पण त्याचेच एक उदाहरण होते. लोक बहुमूल्य दूध वाया घालवायला तयार नव्हते त्यांना माहीत होते की विहीरीत दूध टाकणे व्यर्थ आहे त्यामुळे त्यातून त्यांना काही मिळणार नाही. त्यामुळे विहीरीत दूधाऐवजी पाणी टाकले तर कोणालाही समजणार नाही असा विचार त्यांनी केला व सर्वांनी दूधाऐवजी पाणीच विहीरीत ओतले. याचा परिणाम दूधाच्या ऐवजी विहीर पाण्याने भरली.’
बिरबलची चतुराई बघून अकबरने त्याची पाठ थोपटली. बिरबलने सिध्द करून दाखविले की कधी कधी लोकं एकसारखाच विचार करतात."
========++++++++++========
"थंडीचे दिवस होते. सम्राट अकबरने एके दिवशी एक घोषणा केली की त्याच्या राजवाडयासमोरच्या जलकुंडात जो कोणी रात्रभर उभा राहिल, त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील. हि दवंडी राज्यभर पिटवली गेली. ती दवंडी ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होता.
तो माणूस त्या थंडीत रात्रभर जलकुंडात कुडकुडत उभा राहतो. हया थंडीने तो माणूस मरून जाईल असे सेवकाने बिरबलला सांगितले. बिरबल बोलला ‘तो डोक्याने मजबूत आहे व यश मिळविण्यासाठी तो तयार आहे.’
दुसऱ्या दिवशी सकाळी अकबर येतो तेव्हा तो माणूस आपल्या जागेवर आनंदात उभा असतो. तो माणूस त्या थंड पाण्याच्या जलकुंडातून बाहेर येतो व आपण यशस्वी झालो असे त्याला वाटते. ‘तू ही अशक्य गोष्ट कसे काय करू शकला?’ राजाने विचारले. ‘हे अतिशय अवघड काम होते व ते तू अगदी सहजगत्या शक्य करून दाखविले. माझा यावर विश्वासच बसत नाही.’ यामागचे गुपित काय?’
‘महाराज हया मागे गुपित असे काहीही नाही. मी फक्त विजयी होण्याचा निर्धार केला होता.’ तो गरीब माणूस बोलला.
अकबरने विचारले ‘तू तुझी पूर्ण रात्र या गार पाण्यात कशी घालवली?’
‘मी राजवाडयातील दिव्याकडे बघत होतो.’
‘आता लक्षात आले!’ अकबर बोलला. ‘तर तू तुला लागणारी ऊब माझ्या राजवाडयात रात्रभर चालू असणाऱ्या दिव्यापासून मिळविली त्यामुळे तुला थंड पाण्यात थंडी वाजलीच नाही व तुझी पूर्ण रात्र आरामात गेली. तर याबाबतीत मी तुला काहीही बक्षिस देणार नाही. तू तुझ्या घरी जाऊ शकतोस.’
तो गरीब माणूस दुःखी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलकडे जाऊन संपूर्ण घटना त्याला सांगतो. बिरबल त्याला म्हणतो ‘तू घरी जा, मी बघतो काय करायचे ते.’
दुसऱ्या दिवशी बिरबल अकबरकडे येतो व म्हणतो की ‘मी आता खिचडी तयार करायला शिकत आहे , तरी उदया सकाळी तुम्ही माझ्या घरी खिचडीची चव बघायला या.’
बिरबलने जेवणाचे आंमत्रण दिल्यामुळे अकबर खुश झाला. दुसऱ्या दिवशी अकबर बिरबलच्या घरी पोचला. बिरबलने त्याचे स्वागत केले व त्यांना बसविले.
बराच काळ गेल्यानंतरही बिरबलच्या घरातून कोणीही राजाला साधे पाणीही दिले नाही. अकबरला खूप भूक व तहान लागली होती.
‘बिरबल कूठे आहे?’ राजाने विचारले.
‘घराच्या बाहेर बागेत.’ सेवकाने उत्तर दिले.
‘मी तासाभरापूर्वीही हाच प्रश्न विचारला होता , तेव्हाही तू हेच उत्तर दिले होते.’ अकबरने विचारले ‘तो बागेत काय करत आहे?’
सेवक म्हणाला. ‘माफी असावी महाराज, तो खिचडी बनवण्यात व्यस्त आहे.’
अकबर खूप चिडला व उठून उभा राहिला आणि सेवकावर ओरडला.
सेवक म्हणाला , ‘जे सत्य आहे मी तेच सांगत आहे.’
अकबर दरबाऱ्यांबरोबर बिरबलच्या बागेत गेला. बिरबलने एक छोटीशी चूल पेटवून बऱ्याच उंचावर एका मडक्यात खिचडी शिजवायला ठेवली होती.
‘कुठे आहे तुझी खिचडी?’ अकबरने विचारले.
बिरबलने उंचावर टांगलेल्या मडक्याकडे बोट दाखविले. अकबर व सर्व दरबाऱ्यांनी आपल्या माना त्या मडक्याकडे वळविल्या.
‘हे काय आहे बिरबल?’ तू एवढा हुशार आणि चतुर मग तुला एवढे समजत नाही की खिचडी आणि विस्तवात एवढे अंतर असेल तर मडक्यापर्यंत उष्णता पोहचणार नाही व खिचडी कशी शिजेल?’
तेव्हा बिरबल म्हणाला ‘क्षमा असावी महाराज दूरच्या दिव्याची ऊब घेऊन एखादा माणूस रात्रभर कडाक्याच्या थंडीत उभा राहू शकतो तर मग याच न्यायाने इतक्या अंतरावरून विस्तवाच्या ऊबेने खिचडी शिजायला काय हरकत आहे?’
अकबर बोलला, ‘मला आता समजले की तुला काय म्हणायचे आहे. मी त्या गरीब माणसाबरोबर दृष्टपणा केला आहे व मला माझी चूक लक्षात आली आहे. मी तुला वचन देतो की मी त्याला दोनशे सुवर्णमुद्रा देईन.’
त्या गरीब माणसाला दुपटीने सुवर्णमुद्रा मिळणार आहे म्हणून बिरबल आनंदी झाला. ‘कृपया आपण माझ्या घरात चलावे तेथे मी आपल्या जेवणाची व्यवस्था केली आहे. बऱ्याच प्रकारचे खादय पदार्थ व खिचडी यांची मेजवानी ठेवली आहे.’
सर्वांनी आनंदाने व हसत खेळत जेवण केले."
========++++++++++========
लढाया, युद्ध ही बादशहासाठी नेहमीची बाब असल्यामुळे बहुतेकवेळा बादशहा शस्त्र आणि हत्यारांचाच विचार करीत असायचा. कोणत्याही युद्धात अगदी सहज विजय मिळावा म्हणून आपल्या संग्रहात अतिशय चांगली आणि सर्वोत्कृष्ट हत्यारे असावीत यासाठी बादशहा प्रयत्न करायचा. आपल्या जवळ असलेली हत्यारे आणि शस्त्रे चांगल्या दर्जाची आहेत की नाही याची माहिती घ्यावी म्हणून एके दिवशी दरबारात बसल्यावर बादशहाने प्रश्न विचारला, ‘सर्वात चांगले हत्यार कोणते?’
कोणताही प्रश्न बादशहा सहजा सहजी विचारीत नसल्यामुळे दरबारातील मंडळी गोंधळात पडली. बादशहाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे याचा विचार करायलाही त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे कुणी तोफ, कुणी बंदूक, कुणी भाले तर कुणी बर्ची, बिचवा अशा हत्यारांची नावे सांगितली. बादशहाला यातील एकही उत्तर पंसत पडले नाही.
बादशहाने बिरबलाला विचारल्यावर बिरबलाने अतिशय समर्पक उत्तर दिले, ‘महाराज, लढाईच्या वेळी हाताला लागेल ते हत्यार सर्वोत्कृष्ट’ बिरबलाचे उत्तर तसे समाधानकारक होते तरीही बादशहाचे समाधान झाले नाही. त्यामुळे बादशहाने विचारले, ‘तू हे सिद्ध करून दाखवशील?’
‘उद्याच दाखवतो.’ दुसऱ्या दिवशी सकाळीच बिरबलाने आपल्या उत्तराची सत्यता पटविण्यासाठी योजना आखली. ऐन बाजाराच्या वेळी त्याने मस्त झालेला हत्ती बाजारपेठेत सोडला. मस्त झालेला हत्ती येत आहे असे पाहून बाजारपेठेत धांदल उडाली आणि लोक सैरावैरा धावायला लागले. रस्त्यावर सुरू असलेली गडबड पाहण्यासाठी बिरबल बादशहाला घेऊन महालाच्या गच्चीवर गेला.
थोड्या वेळाने त्या रस्त्यावरून एक पैलवान येत होता. समोरून मस्त झालेला हत्ती येतोय याची पैलवानाला खबर नव्हती. हत्ती एकदम पैलवानाच्या समोर आला. काय करावे ते त्याला कळेना. त्याने इकडे तिकडे पाहिले. सहज हातात येईल असे काही दिसत नव्हते. इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुत्र्यावर गेली. काहीही विचार न करता पैलवानाने ते कुत्रे उचलले आणि मस्त झालेल्या हत्तीच्या अंगावर फेकेले. विचित्र प्रकारचा आवाज करीत अचानक अंगावर आलेल्या कुत्र्यामुळे हत्ती गोंधळून गेला आणि त्याने आपला मार्ग बदलला. हे दृश्य पाहिल्यावर बादशहाला बिरबलाचे म्हणणे पटले.
एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.' शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्याचे दागिने परत केले.
========++++++++++========
अकलेचा घडा
![]() |
| akbar and birbal story in marathi |
बादशाच्या दरबारात खूप विद्वान लोक आहेत, याची माहिती अनेक देशांतील राजा महाराजांना झाली होती. या विद्वानांची परीक्षा पाहण्यासाठी हे देशोदेशीचे राजे अनेक युक्त्या करीत असत. दरबारातील विद्वानामुळे बादशहाचा पसरलेला लौकिक कमी व्हावा, हाच त्यांचा त्यामागचा उद्देश असायचा.
बादशहाच्या दरबारातील विद्वानांची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून श्रीलंकेच्या राजाने एका दूतासोबत बादशहाला एक पत्र पाठविले. या पत्रात असे लिहिले होते, ‘महाराज तुमच्या दरबारात अनेक विद्वान आहेत. त्यामुळे तुमच्याकडे अकलेला काही तोटा नसणार हे उघड आहे. आमच्या देशात मात्र अकलेचा दुष्काळ पडला आहे. तरी कृपया आपण आम्हाला एक घडाभर अकल पाठवावी, ही विनंती.’ अशा आशयाचे पत्र वाचल्यावर बादशहा बुचकळ्यात पडला. घडाभर अक्कल कशी पाठवायची, हे काही बादशहाला उमजेना.
बादशहाने बिरबलाला बोलावले आणि ते पत्र दाखविले. श्रीलंकेच्या राजाचा डाव बिरबलाच्या लक्षात आला. त्याला धडा शिकवण्यासाठी म्हणून बिरबल म्हणाला, ‘महाराज, घडाभर अक्कल गोळा करायला तीन-चार महिने लागतील. तोपर्यंत या दूताला आपल्या इथे थांबवून घ्या.’
दरबारातून बाहेर आल्यावर बिरबल मळ्यात गेला. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात कोहळ्याचे वेल लावले होते. या वेलीना आता फुले यायला सुरूवात झाली होती. बिरबलाने लगेच आपल्या सेवकाला कुंभाराकडे पाठवले आणि दोन चार चांगले भाजलेले घडे आणायला सांगितले. कोहळ्याच्या वेलीला बारीक फळे यायला लागल्यावर बिरबलाने ही फळे घड्यात टाकली आणि शेतकऱ्याला त्याकडे लक्ष द्यायला सांगितले.
काही दिवसानंतर घड्यात सोडलेले कोहळे खूप मोठे झाले. आता त्यांना घड्याच्या बाहेर काढता येणे अशक्य आहे असे वाटल्यावर बिरबलाने हे कोहळे वेलीपासून वेगळे केले. त्या घड्याची तोंडे कापडाने बांधली. ते घडे घेऊन बिरबल दरबारात आला. श्रीलंकेच्या राजदूताच्या स्वाधीन ते घडे करून बिरबल म्हणला, ‘तुमच्या महाराजांच्या इच्छेप्रमाणे आम्ही हे अकलेचे घडे पाठावीत आहोत. त्यांना म्हणावं या घड्यातील अक्कल काढून घ्या आणि घडे आम्हाला परत पाठवा कारण आमच्याकडे अकलेचा नसला तरी घड्यांचा दुष्काळ आहे.’ बिरबलाने पाठविलेली अक्कल श्रीलंकेच्या राजाला काढता आली नाही.
बिरबलाने त्यांची केलेली फजिती पाहून बादशहा मात्र बिरबलाच्या अक्कल हुशारीवर खूप खुश झाला.
========++++++++++========
बिरबलाला घाबरवून टाकावे, या उद्देशाने बादशहाने एकदा आपण भयंकर भडकलो आहोत, असा खोटाच आव आणीत तो बिरबलाला वाटेल तसे बोलू लागला. परंतु आपल्या बोलण्याने घाबरून न जाता उलट बिरबल मोठमोठ्याने रडायला लागल्याचे पाहून अचंबित झालेला बादशहा त्याला म्हणाला - ''बिरबल, अरे, मी इतका भडकलो असता तू भीती वाटून थरथर कापशील, असे मला वाटले होते, उलट त्याऐवजी हल काढून तू का रडायला लागलास ? ''
बादशहाने असे विचारताच त्याला एका बाजूला नेऊन बिरबल म्हणाला, ''महाराज, माझा कसलाही अपराध नसताना तुम्ही माझ्यावर एवढे भडकलात की, मला असे वाटते की तुमच्या डोक्यात काही तरी फरक झाला. साहजिकच 'आता आपल्या राज्याचे आणि प्रजेचे कसे होणार?' या काळजीने माझा शोक अनावर झाला'' बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा फारच खजील झाला.
========++++++++++========
एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल.
बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन.
दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न.
बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच.
शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला खाविंद, माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे.
बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला.
========++++++++++========
RELATED SEARCHES :-
birbal story in marathi, akbar and birbal story in marathi, akbar birbal story in marathi writing, akbar birbal story book in marathi pdf, akbar birbal stories in marathi book, akbar birbal khichdi story in marathi, marathi bodh katha birbal, akbar birbal marathi goshti, akbar birbal short stories in marathi, akbar birbal cha goshti, akbar birbal marathi story,akbar birbal goshti marathi, akbar birbal marathi katha, akbar birbal marathi, akbar birbal short story in marathi, birbal story marathi, akbar birbal story in marathi with moral,short story of akbar and birbal in marathi, akbar birbal goshti in marathi, akbar ani birbal marathi goshti, akbar birbal katha marathi.
THANKS FOR VISITING MY BLOG OR WEBSITE.
धन्यवाद मित्रांनो , आपन या ब्लाँग ला भेट दिल्याबद्दल. आम्हाला आशा आहे की, आपल्याला या ब्लाँग मधील अकबर आणि बिरबलाच्या गाेष्टी आवडल्या असतील. तर आपल्याला अशा विविध प्रकारच्या - विविध गाेष्टी हव्या असतील तर या ब्लाँगला ईमेल (EMAIL) द्वारे सब्सक्राईब (SUBSCRIBE) किंवा फाँलाे करून घ्या.













